Effective Home Remedies for Pitta| पित्ताचे सोपे घरगुती उपाय| (2024)

Home Remedies for Pitta

सध्याच्या काळात बदललेले राहणीमान, कामाचे ताणताणाव, बाहेरचे खाण्याचे वाढलेले प्रमाण, sedentary lifestyle, technology मुळे कमी झालेली शरीराची हालचाल, रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर scroll करत बसने इत्यादी सर्व कारणाने पित्ताचा त्रास हा प्रत्येकच घरात पाहायला मिळतो. म्हणून या लेखात आपण पित्ताचे सोपे घरगुती उपाय (Home Remedies for Pitta) पाहणार आहोत, ज्यांचा रोजच्या आयुष्यात उपयोग केल्यास अगदी सहज पणे पित्त नियंत्रणात आणता येते.

Home Remedies for Pitta

  • पित्त म्हणजे काय? (What Is Pitta Dosha?)

आयुर्वेदानुसार पित्त म्हणजेच अग्नी (energy) होय. पित्ताचे उष्ण व जल हे मुलभूत गुणधर्म आहेत. आयुर्वेदानुसार पित्ताचे पाच प्रकार सांगण्यात आले आहेत. पाचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त, अलोचक पित्त आणि भ्राजक पित्त.

अष्टांगहृदय या आयुर्वेद ग्रंथानुसार पित्ताचे पुढील गुणधर्म सांगितले आहेत: तेलकट (oily), तीक्ष्ण (भेदक-penetrating), उष्ण (hot), लघु (हलके-light), ईकडून-तिकडे वाहणारे (free flowing) व द्रव (liquid) स्वरूपाचे.

योग्य प्रमाणात असताना पित्त हे शरीरात मुख्यता पाचन करण्याचे, शरीराचे temperature maintain ठेवण्याचे, दृष्टी म्हणजे पाहण्याचे, शरीराचे color व complexion ठेवण्याचे, तसेच बुद्धिमत्ता व विचार करण्याचे काम करते. म्हणून वरील कार्ये सुरळीत चालण्यासाठी शरीरात सम (balanced) प्रमाणात पित्त असणे गरजेचे आहे. पित्ताचा असमतोल (imbalance) निर्माण झाल्याने शरीरात विवध प्रकारचे शारीरिक व मानसिक लक्षणे दिसायला लागतात.

  • शरीरात पित्त वाढण्याची लक्षणे (Signs And Symptoms Of Increased Pitta)

पित्त हे निसर्गतः शरीर व मनाच्या ठिकाणी कार्य करत असल्याने त्याच्या मध्ये झालेल्या वृद्धीची लक्षणे ही देखील सामान्यता शारीरिक व मानसिक असे दोन्ही स्तरावर दिसतात. ती पुढील प्रमाणे

  • पित्त वाढल्याची शारीरिक लक्षणे (Physical Symptoms of Pitta Dosha Vrudhi)

  1. तहान आणि/ किंवा भूक जास्त लागणे  (Increase in hunger or thirst)
  2. केस पांढरे होणे किंवा केस गळणे (Greying / loss of hair)
  3. एग्झिमा, तोंडावर pimples (Acne), किंवा वेगवेगळे त्वचा रोग होणे
  4. शरीरातील hormones चे प्रमाण बिघडणे. (Hormonal imbalance)
  5. सांधे दुखी (Joint pain)
  6. पोटातील उष्णता वाढल्याने छातीत जळजळ होणे (heartburn), जेवण वरती येणे (acid reflux), पोटात जखमा होणे (ulcers)
  7. Diarrhoea, constipation, or impaired digestion.
  8. चक्कर येणे (Giddiness)
  9. डोकं दुखणे (migraines)
  10. शरीरातून गरम वाफा आल्यासारखे वाटणे (Hot flashes)
  11. थंड पदार्थाची इच्छा होणे (want for substances that have a cooling effect on the body)
  12. श्वासोच्छवासात दुर्गंधी किंवा शरीराचा दुर्गंधीत वास येणे (Bad breath/body odour)
  13. घसा खवखवणे (Sore throat)
  14. वेळेत न खाल्यास मळमळ होणे (Nausea upon missing meals)
  15. झोप न लागणे (Insomnia), डोळे जळजळ होणे
  16. स्तन किंवा अन्डाशयाच्या ठिकाणी दुखणे (Tenderness in breasts/testicles)
  17. मासिक पाळीच्या वेळी जास्त किंवा वेदनादायी रक्त स्राव होणे. (Painful or heavy menstrual bleeding)
  • पित्त वाढल्याची मानसिक लक्षणे (Behavioural Symptoms of Pitta Dosha Vrudhi)

  1. सहनशीलता कमी होणे (Impatience)
  2. राग अधिक येणे, चिडचिड होणे, सतत निराशा होणे (Increased anger, Irritation)
  3. अहंकार वाढणे (Ego problems)
  4. नाराजी वाढणे  (Resentment)
  5. दुसऱ्यांबद्दल हेवा/ मत्सर्तेचा भाव वाढणे (Jealousy)
  6. Judgemental होणे
  • शरीरात पित्त वाढण्याची कारणे (Factors That increases Pitta Levels in Body)

आपल्या शरीरात पित्त वाढण्याची मुख्य २ कारणे आहेत. १) पित्तकारक आहार व २) पित्तकारक विहार होय.

चला तर मग पाहूया पित्तकारक आहार व विहार म्हणजे नेमकं काय?

१)पित्त-कारक आहार (Foods Increasing Pitta in the Body)

  1. तिखट- झोंबणारे (pungent), आंबट (sour),खारट (salty),एकदम झणझणीत (very spicy), Deep-fry केलेले, प्रोसेस करून जतन केलेले (packged food), मांसाहार (red meat).
  2. जास्त प्रमाणात कॉफी (coffee), चहा (black tea), तंबाखू (nicotine-smoking), दारू (alcohol) आणि अन्य stimulants चे सेवन करणे.

२)पित्त-कारक विहार (Activities Increasing Pitta in the Body)

  1. रात्री जागरण करणे (Sleeping late at night)
  2. जास्त राग-राग करणे, किंवा नेहमी दुखी राहणे (Too much anger or sadness)
  3. जास्त वेळ उन्हात किंवा उष्ण ठिकाणी बसणे (Too much exposure to Sun or heat)
  4. अत्याधिक मानसिक अथवा शारीरिक ताण तणाव असणे (Excessive mental or physical stress)

Also read: Foods to Avoid after monkey bite 

  • पित्त लगेचच कमी कसे करावे (How To Reduce Pitta Immediately)

शरीरातले पित्त लगेचच कमी करण्यासाठी आयुर्वेदात सांगितल्या प्रमाने आहार व विहाराचे पालन केले असता पित्तापासून त्वरित आराम मिळतो.

१) पित्त शमन (कमी) करणारा आहार (Pitta Reducing Diet)

मधुर (sweet), तिक्त (कडू- Bitter), कषाय (तुरट-astringent) रसात्मक (taste) आहार घेतल्याने पित्ताचे लवकर शमन होते.

गायीचे तुप (cow ghee), दुध (milk), दही (curd) (दुपारच्या जेवणात), ताक (buttermilk) (दुपारच्या जेवणात), नारळ पाणी (coconut water)

सफरचंद (Apples) (sweet), द्राक्षे (ripe grapes), खरबूज (melon), मनुका (plum), शतावरी (asparagus), खजूर (dates), पेअरचे फळ (pear), दाळिंब (pomegranate), आंबा (mango), संत्री (orange), कलिंगड (watermelon),  strawberries, पपई (papaya), अवोकॅडो (Avocado)

काकडी (cucumber), फुलकोबी (cauliflower), हिरव्या पालेभाज्या (leafy greens), ढोबळी मिर्ची (bell pepper), ब्रोकोली (broccoli), कोथिंबीर (coriander), वाटाणे (peas), भोपळा (pumpkin), गाजर (radishes), कोबी (cabbage),  रताळे (sweet potato), पालक (spinach), lettuce, बटाटा (potatoes), मशरूम (mushrooms), आले (ginger), आणि पुदिना (mint)

सातू (Barley), ओट्स (oats), राजगिरा (quinoa), गहू (wheat), तसेच वेगवेगळ्या डाळी, या सर्व पदार्थाचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करून शरीरातील पित्तावर नियंत्रण ठेवता येते.

Also read: 7 Effective Gut Health Hacks

२) पित्त शमन (कमी) करणारा विहार (Pitta Reducing Activities)

दररोज एकाच निश्चित वेळी आहार घ्यावा

रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये

दररोज किमान अर्धा तास चालावे (brisk walking)

दररोज योग्य प्रमाणात व्यायाम करावा.

सतत ची चिंता, क्रोध, मानसिक ताणतणाव कमी करावा व ते कमी करण्यासाठी meditation / ध्यान करावे, कामात अथवा आवडीच्या एखाद्या activity मध्ये व्यस्त राहावे.

सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहून ईश्वराप्रती कृतज्ञ राहावे.

खाली दिलेले काही योग आसने व प्राणायाम करावे

३) पित्त कमी करणारी काही आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic pitta dosha medicines)

खाली काही आयुर्वेदिक औषधे सांगितली आहेत. त्यांचे अनुभवी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावे.

  1. अम्लपित्तारी वटी (for hyperacidity)
  2. अविपत्तिकर चूर्ण (digestive problems, hyperacidity)
  3. यष्टीमधू (for acid peptic diseases)
  4. निशामल्की (anti-allergic)

४) पित्त कमी करणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती (Ayurvedic Herbs To Reduce Pitta)

कोरपड (Aloe Vera)

हळद (Turmeric)

कडू निंब (Neem)

आवळा (Amalaki)

त्रिफळा (Triphala)

Also read: 9 Cluster Headache home remedies

अनुभवाचे बोल ( Notes from Personal Exprience)

सध्याच्या काळात घरोघरी पित्ताचे आजार ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. परंतु योग्य आहार, नियमित व्यायाम, योगा व ध्यान ई. च्या सहायाने पित्त हे नियंत्रणात ठेवता येते.

रोज सकाळी उठल्या उठल्या १ किंवा २ ग्लास पाणी पिल्याने पोटाचे आजार कमी होतात.

रोज रात्री पाण्यात जिरा किंवा बडीशेप भिजत घालून सकाळी त्या पाण्याचे सेवन केले असता पित्ताचे त्रास कमी होतात.

शक्यतो सकाळी उपाशी पोटी चहा, कॉफी, तंबाखू इ. चे सेवन करू नये.

रात्री झोपतना १ कप दुधातून १ चमचा गायीच्या तुपाचे सेवन केले असता पित्ताचा त्रास कमी होतो व पोट ही नीट साफ होते.

 

Leave a Reply